Join us

IPL 2020 : सुरेश रैनाचे CSKमध्ये परतीचे मार्ग बंद? मालक एन श्रीनिवासन यांचं मोठ वक्तव्य

IPL 2020 : रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारलेली नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 22:09 IST

Open in App
ठळक मुद्दे29 ऑगस्टला सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलासुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात भांडण झाल्याची चर्चा

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातून सुरेश रैनानं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्काच बसला. रैनानं वैयक्तिक कारण सांगून दुबईतून मायदेशात परतला. CSK संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनीही रैनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याला खडेबोल सुनावले होते. अर्थात त्यांनी त्या विधानावरून नंतर माघार घेत, रैना CSK कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगितले. त्यात रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारली नाही. त्यामुळे रैना आयपीएलसाठी दुबईत पतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी मोठी अपडेट्स दिल्या. 

महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

''तो कॉमेडियन प्राईमा डोन्नास, सारखा वागत आहे. चेन्नई सुपर किंग्स हे एक कुटुंब आहे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंनी याची जाण असायला हवी. तुम्ही नाखूष असाल, तर खुशाल जा. मी जबरदस्ती करणार नाही. काहीवेळा यश डोक्यात जाते,''असे श्रीनिवास म्हणाले होते. या विधानावरून त्यांच्यावर नेटिझन्सनी जोरदार टीका केली.  त्यानंतर CSKनं एक ट्विट केलं आणि त्यात श्रीनिवासन यांनी लिहिलं की,''रैना हा आमच्या CSK कुटुंबाचा सदस्य आहे. मागील दहा वर्षांपासून तो आमच्यासोबत आहे. फ्रँचायझी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे आणि या कठीण काळात आमचा त्याला पूर्ण पाठींबा आहे.''  

संघ व्यवस्थनासोबत वाद झाल्याच्या चर्चांना रैनानं अफवा असल्याचे म्हटले. पण, त्याच्या CSK सोबतच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यावर एऩ श्रीनिवासन यांनी स्पष्ट मत मांडलं. ते म्हणाले,''CSKतील संघातील अन्य खेळाडूंप्रमाणे त्याला मी मुलासारखी वागणूक दिली. फ्रँचायझीनं कधीही क्रिकेट सदर्भातल्या निर्णयावर हस्तक्षेप केला नाही, त्यामुळेच आयपीएलमध्ये संघानं यश मिळवलं आहे. मागील 60व्या दशकापासून इंडिया सिमेंट क्रिकेटशी जोडलेले आहेत. मी नेहमी तसाच राहणार आहे.''

श्रीनिवासन यांनी PTIला सांगितले की,''तूम्ही हे समजून घ्या. रैना संघात पुनरागमन करेल किंवा नाही, हे माझ्या अत्यारित नाही. आम्ही टीम अन् फ्रँचायझी विकत घेतली आहे, परंतु आम्ही खेळाडूंना नाही. संघ आमचा आहे, परंतु खेळाडू नाही. मी खेळाडूंना विकत घेतलेलं नाही. मी कॅप्टन नाही. संघात कुणाला घ्यावं कुणाला नाही हे मी कधीच संघ व्यवस्थापनाला सांगितलेले नाही. आमच्याकडे दिग्गज कर्णधार आहे, त्यामुळे माझा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.''

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

टॅग्स :आयपीएल 2020सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स