ICC T20I Rankings : टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

ICC T20 batsman rankings 2020: पाकिस्ताननं तिसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:17 PM2020-09-02T17:17:29+5:302020-09-02T17:19:11+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 batsman rankings 2020: Only 2 Indian players in Top 10, Virat Kohli ranked No.10  | ICC T20I Rankings : टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

ICC T20I Rankings : टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देटॉम बँटन आणि मोहम्मद हाफीज यांना क्रमवारीत मोठा फायदा इंग्लंडचा सलामीवीर टॉम बँटनने मालिकेत 137 धावा केल्या

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेंटी-20 मालिकेमुळे टॉम बँटन आणि मोहम्मद हाफीज यांना क्रमवारीत मोठा फायदा झाला. आयसीसीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली दहाव्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं अव्वल स्थान कायम राखले आहे, तर टॉप टेनमध्ये विराटसह भारताच्या दोनच फलंदाजांना स्थान कायम राखता आले आहे.

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

इंग्लंडचा सलामीवीर टॉम बँटनने  मालिकेत 137 धावा केल्या, त्यात पहिल्या सामन्यात 71 धावांच्या खेळीचा समावेश होता. त्यानं 152 व्या स्थानावरून 43व्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज हाफिजनं अखेरच्या सामन्यात नाबाद 86 धावा करताना पाकिस्तानला मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानं तीन सामन्यांच्या मालिकेत 155 धावा केल्या आणि त्यामुळे तो 68व्या स्थानावरून 44व्या स्थानावर पोहोचला. इंग्लंडचा डेव्हीड मलान पाचव्या स्थानी आला आहे.  

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

गोलंदाजांत पाकिस्तानचा फिरकीपटू शाबाद खान एका क्रमांकाच्या सुधारणेसह आठव्या स्थानी पोहोचला, त्यानं तीन सामन्यांत 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा टॉम कुरन आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी हे दोघंही 20व्या स्थानावर संयुक्तपणे विराजमान आहेत. कुरननं 7 स्थानांची, तर आफ्रिदीनं 14 स्थानांची सुधारणा केली.

पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल
फलंदाजांत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 869 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर विराट कोहली 673 गुणांसह दहाव्या स्थानी आहे. लोकेश राहुल 824 गुणांसह दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच 820 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

Web Title: ICC T20 batsman rankings 2020: Only 2 Indian players in Top 10, Virat Kohli ranked No.10 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.