Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2020: मुख्य प्रायोजकाची माघार हे संकट नाही- सौरव गांगुली

कोणतेही आर्थिक संकट निर्माण होण्याच्या शक्यता त्यांनी फेटाळल्या.​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:58 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी चीनी मोबाईल कंपनी विवोचाआयपीएलसोबतचा प्रायोजकत्वाचा करार रद्द होणे हा फक्त एक धक्का असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणतेही आर्थिक संकट निर्माण होण्याच्या शक्यता त्यांनी फेटाळल्या.बीसीसीआय आणि वीवो यांनी भारत आणि चीनच्या सीमेवर झालेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे चीनी उत्पादनांवरील बहिष्कारच्या मोहिमेमुळे गुरुवारी २०२० आयपीएल साठीची आपला करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रायोजक हा आयपीएलच्या व्यावसायिक महसुलाचा महत्त्वाचा भाग आहे. चिनी कंपनीने २०१८ ते २०२० या पाच वर्षांसाठी २१९० कोटी रुपयांत मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार घेतले होते. गांगुली यांनी एका वेबिनारमध्ये सांगितले की, मी याला वित्तीय संकट म्हणणार नाही. हा फक्त एक धक्का आहे. बीसीसीआय ही खूप मजबूत संस्था आहे. गेल्या काही काळामध्ये खेळाडू आणि व्यवस्थापकांनी त्याला मजबूत केले आहे. बीसीसीआय या अशा प्रकारच्या धक्क्यांपासून सावरण्यास सक्षम आहे.’ माजी भारतीय कर्णधाराने सांगितले की, तुम्ही तुमचे पर्याय नेहमी खुले ठेवले पाहिजे. समजुतदार लोक नेहमी हेच करतात. तुम्ही याला फक्त एकाच पद्धतीने करु शकतात की व्यावसायिक दृष्टीने मजबूत व्हा. मोठ्या गोष्टी एका रात्रीत उभ्या राहत नाही. आणि एक रात्रीत निघूनही जात नाहीत. बऱ्याच काळापासून केलेली तयारी तुम्हाला नुकसान सहन करण्यासाठी तयार करतात आणि यशासाठी देखील तयार ठेवतात.’

टॅग्स :सौरभ गांगुलीआयपीएलविवो