Join us

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 19:15 IST

Open in App

मुंबई: इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक संघाला आपापल्या कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करायची होती. त्यानुसार आज अंतिम मुदत संपण्यापूर्वी आठही संघांनी लिलावातील गणिताची जुळवाजुळव करत काहींना मुक्त केले, तर अनेकांना कायम राखले. अशी आकडेमोड करून संघांनी आपापल्या खात्यात जास्तीची रक्कम शिल्लक राखण्याचा प्रयत्न केला.

पण आता त्यांची खरी कसरत लागणार आहे. बजेटमध्ये त्यांनी उर्वरित संघ पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. आता सर्व संघांचे मिळून २०७.६५ कोटी रक्कम बजेट मध्ये आहेत. पण लिलावात चेन्नई सुपर किंग्सला केवळ पाचच खेळाडू घेता येतील. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना प्रत्येकी ११ खेळाडू घ्यायचे आहेत. 

किती बजेट मध्ये किती खेळाडू

चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी - ५ खेळाडू ( २ परदेशी)दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी - ११ खेळाडू ( ५ परदेशी) किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी - ९ खेळाडू ( ४ परदेशी)कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी - ११ खेळाडू ( ४ परदेशी)राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी- ११ खेळाडू ( ४ परदेशी)मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी - १२ खेळाडू ( ६ परदेशी)

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स