Join us  

IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगानं घेतली माघार

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 6:13 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावलं आहे.मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत

मुंबई इंडियन्सला मंगळवारी मोठा धक्का बसला. आयपीएल जेतेपद कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सनं कसून सरावालाही सुरुवात केली असाताना त्यांचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाची आयपीएल खेळणार नाही. मुंबई इंडियन्सनं त्याच्या बदली खेळाडूचं नाव मंगळवारी जाहीर केलं.

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

यंदाही त्यांचे पारडे जड मानले जात आहे आणि त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. पण, श्रीलंकेचा 36 वर्षीय गोलंदाज वैयक्तिक कारणास्तव यूएईत दाखल होऊ शकणार नाही. मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही दिवसांत सर्जरी होणार आहे. त्यामुळे तो वडिलांसोबतच राहणार आहे.

मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता.   

मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे. संघमालक आकाश अंबानीनं सांगितलं की,''संघासाठी जेम्स हा योग्य खळाडू आहे. लसिथ मलिंगाला आमचे पूर्ण सहकार्य आहे.''     

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

आयपीएल 2020 लिलावात कोणाला घेतलं ताफ्यात?  

ख्रिस लीन - 2 कोटीनॅथन कोल्टर नील - 8 कोटीसौरभ तिवारी - 50 लाखमोहसीन खान - 20 लाखदिग्विजय देशमुख - 20 लाखप्रिंस बलवंत राय - 20 लाख

टॅग्स :मुंबई इंडियन्सलसिथ मलिंगाआयपीएल 2020