Join us

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचे चाहते कोरोना विसरले; कॅप्टनला पाहण्यासाठी केली मोठी गर्दी

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीनं पीयुष चावला आणि रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीचा सामना केला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:14 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 11 असे एकूण 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाच्या वेळापत्रकाला विलंब झाला. संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएलचा सलामीचा सामना खेळणार की नाही, यावरही बीसीसीआयनं चर्चा सुरू होती. पर्याय म्हणून बीसीसीआयनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाची निवड केली होती. पण, चेन्नई सुपर किंग्सचे सदस्य निगेटिव्ह आले असून संघानं शुक्रवारी सरावाला सुरूवात केली. कॅप्टन धोनीनं नेट्समध्ये तुफान फटकेबाजी केली.

IPL 2020 : तारीख पे तारीख; चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितली वेळापत्रकाची नवीन तारीख

कोरोना व्हायरसमुळे आयपीएस भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.  दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या सदस्य 14 दिवासांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य सदस्यांची गुरुवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या दुबईतील केंद्रात चेन्नईच्या खेळाडूंनी सराव केला. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येनं आयसीसीच्या अकादमीबाहेर गर्दी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते सर्व धोनीच्या नावाचा गजर करत होते.

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :आयपीएल 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्ससंयुक्त अरब अमिराती