अबूधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वात आपली मोहीम रुळावर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल. काही सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली असली तरी केकेआर संघ जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये सामील आहे. सुनील नारायण सुरुवातीला अपयशी ठरल्यानंतर आता फलंदाजी व गोलंदाजीमध्ये फॉर्मात आला आहे. मधल्या फळीत इयोन मॉर्गनची उपस्थिती संघाला मजबुती प्रदान करणारी आहे आणि नितीश राणानेही प्रभावित केले आहे. स्वत: फॉर्मात नसलेल्या कार्तिकने चेन्नईविरुद्ध चांगले नेतृत्व केले. विशेषत: गोलंदाजीतील बदल प्रभावी होते.
डोप चाचणी वादात
आयपीएल स्पर्धेत अद्याप डोप चाचणीसाठी नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. सध्याची स्थिती बघता स्पर्धा डोप चाचणीविनाच होण्याची शक्यता आहे. नाडाच्या समितीला डोप नमुने घेण्यासाठी अद्याप यूएईला जाण्याची परवानगी मिळालेली नाही. एवढेच नव्हे तर डोप नमुने व चाचणी यासाठी होणाऱ्या खर्चाच्या रकमेबाबत नाडा व बीसीसीआय यांच्यादरम्यान वाद सुरू आहे. मिळालेल्या वृत्तानुसार नाडाने समिती पाठविण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडे मंजुरी मागितली आहे.
वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३४ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ४३ टक्के तर वाºयाचा वेग २६ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता.
पीच रिपोर्ट । खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल पण स्थिरावल्यानंतर धावा फटकावण्याची संधी. राहुल त्रिपाठी व शेन वॉटसन यांनी गेल्या लढतीमध्ये अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
मजबूत बाजू
पंजाब । केएल राहुल व मयंक अग्रवाल चांगली सुरुवात करण्यास सक्षम. ख्रिस गेलला संधी मिळाली तर फलंदाजी अधिक मजबूत होईल.
कोलकाता । संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. युवा व अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण. शुभमान ,राहुल त्रिपाठी यांची शानदार कामगिरी. नागरकोटी, मावी, कमिन्स, नारायण, वरुण प्रभावी.
कमजोर बाजू
पंजाब सलग तीन पराभवांमुळे मनोधैर्य ढासळले. डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी चिंतेचा विषय. केकेआरविरुद्ध कमकुवत गोलंदाजी अडचणीत आणू शकते.
कोलकाता आंद्रे रसेलला सूर गवसलेला नाही. कर्णधार दिनेश कार्तिक फॉर्मात नाही.