Join us  

IPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video

IPL 2020 : TKRला चौथे जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा खेळाडू Indian Premier League 2020 मध्येही दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 5:03 PM

Open in App
ठळक मुद्देकोलकाता नाइट रायडर्सनं 2012 व 2014मध्ये आयपीएल जेतेपद पटकावलं आहे2011, 2016, 2017 व 2018मध्ये त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता

शाहरुख खानचा मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स ( Trinbago Knight Riders) संघानं कॅरेबिनय प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) यंदाच्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. कर्णधार किरॉन पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी दमदार फलंदाजी करून रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले. नाइट रायडर्सचे हे चौथे CPL जेतेपद आहे. याआधी त्यांनी 2015, 2017 व 2018 मध्ये जेतेपद पटकावले होते.

IPL 2020आधी विराट कोहलीनं स्वतःला लिहिलं भावनिक पत्र; हा Video तुम्हालाही इमोशनल करेल

आनंद पोटात मावेना... विराट कोहलीची IPL 2020 जेतेपदवाली Feeling; पाहा भन्नाट Video

TKRला चौथे जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा खेळाडू Indian Premier League 2020 मध्येही दिसणार आहे. माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. 140kphच्या वेगानं मारा करणारा हा अमेरिकन गोलंदाज यंदाचा मोसम गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी तो दुबईत दाखल झाला आणि KKRनं त्याचा व्हिडीओ पोस्ट केला. इंग्लंडचा गोलंदाज हॅरी गर्नी यानं माघार घेतल्यामुळे KKRनं त्याच्या जागी या वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे. गर्नीनं खांद्यावरील शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि मागील महिन्यात व्हिटॅलीटी ब्लास्ट स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. पॅट कमिन्ससह तोही प्रतिस्पर्धीं फलंदाजांचा त्रिफळा उडवण्यासाठी उत्सुक आहे.

कोण आहे हा गोलंदाज?कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) अमेरिकेच्या 29 वर्षीय जलदगती गोलंदाज अली खान याला करारबद्ध केलं आहे.   अली खान हा IPL मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरणार आहे. CPL मध्ये सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये अली खानचा समावेश आहे. त्यामुळे त्याला जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये मागणी आहे. IPLच्या मागील मोसमात KKRनं त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवले होते. CPL 2020मध्ये त्यानं 8 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या आहेत.  2019मध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 49व्या षटकात तीन विकेट्स घेत अमेरिकेला विजय मिळवून दिला होता.

ड्वेन ब्राव्होनं त्याला CPLमध्ये आणले आणि त्यानं आतापर्यंत 12 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या आहेत. अली खानच्या समावेश झाल्यास KKRकडे आता इयॉन मॉर्गन, टॉम बँटन, आंद्रे रसेल, सुनील नरीन, ख्रिस ग्रीन, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन हे परदेशी खेळाडू असतील. 

पाहा व्हिडीओ

कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders Players List (KKR) - दिनेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक कोलकाता नाइट रायडर्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Kolkata Knight Riders Full Schedule of IPL 2020)23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी26 सप्टेंबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी30 सप्टेंबर, बुधवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई3 ऑक्टोबर, शनिवार, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी10 ऑक्टोबर, शनिवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी18 ऑक्टोबर, रविवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी24 ऑक्टोबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी26 ऑक्टोबर, सोमवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई1 नोव्हेंबर, रविवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी? 

IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो

IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ

टॅग्स :आयपीएल 2020कोलकाता नाईट रायडर्स