कोलकाता नाइट रायडर्सला धक्का; IPL 2020मध्ये इतिहास रचणाऱ्या गोलंदाजाची माघार

KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. इयॉन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमवारीवरून त्याच्यावर टीका होत आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 7, 2020 04:05 PM2020-10-07T16:05:49+5:302020-10-07T16:06:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Kolkata Knight Riders paceman Ali Khan ruled out of IPL 2020 due to injury | कोलकाता नाइट रायडर्सला धक्का; IPL 2020मध्ये इतिहास रचणाऱ्या गोलंदाजाची माघार

कोलकाता नाइट रायडर्सला धक्का; IPL 2020मध्ये इतिहास रचणाऱ्या गोलंदाजाची माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे. गुणतक्त्यात ( Point Table) KKR व CSK प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. CSKची कामगिरी समाधानकारक झाली नसली तर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी एकहाती सामना जिंकला. त्यामुळे CSKचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. इयॉन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमवारीवरून त्याच्यावर टीका होत आहे, शिवाय सुनील नरीनचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्यात KKR ला आजच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे.

यंदाच्या मोसमात KKRने अमेरिकेचा गोलंदाज अली खान ( Ali Khan) याला करारबद्ध केले होते. हॅरी गन्री यानं दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर अली खानला संघात बदली म्हणून घेण्याचा निर्णय घेतला गेला. IPLमध्ये फ्रँचायझीनं करारबद्ध केलेला तो अमेरिकेचा पहिलाच खेळाडू होता. पण, एकही सामना न खेळता त्याला माघारी जावे लागत आहे. त्याला दुखापत झाली. ही दुखापत नेमकी काय आहे, हे अद्याप संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.''दुर्दैवानं अली खान याला दुखापत झाली आहे आणि तो IPL 2020ला मुकणार आहे,''असे KKRनं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या अली खान यानं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाइट रायडर्सनं यंदाची कॅरेबियन प्रीमिअर लीग जिंकली आणि त्यात अली खान याचा मोठा वाटा होता.   

कोण आहे हा गोलंदाज?
कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) अमेरिकेच्या 29 वर्षीय जलदगती गोलंदाज अली खान याला करारबद्ध केलं आहे.   अली खान हा IPL मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरणार आहे. CPL मध्ये सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये अली खानचा समावेश आहे. त्यामुळे त्याला जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये मागणी आहे. IPLच्या मागील मोसमात KKRनं त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवले होते. CPL 2020मध्ये त्यानं 8 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या आहेत.  2019मध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 49व्या षटकात तीन विकेट्स घेत अमेरिकेला विजय मिळवून दिला होता. ड्वेन ब्राव्होनं त्याला CPLमध्ये आणले आणि त्यानं आतापर्यंत 12 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या आहेत.
 

Web Title: IPL 2020 : Kolkata Knight Riders paceman Ali Khan ruled out of IPL 2020 due to injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.