Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2020, KKR vs MI Match: केकेआरविरुद्ध मुंबईचे पारडे जड; सुनील नारायणच्या खेळण्याबाबत साशंकता

प्रीव्ह्यू । आजचा सामना - फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्यात आलेले अपयश केकेआरसाठी महत्त्वाची अडचण ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:04 IST

Open in App

अबूधाबी : गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, मुंबई इंडियन्स आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करण्याची शक्यता नाही. केकेआर संघात जर सुनील नारायण खेळला नाही तर त्याचा मुंबई इंडियन्स संघाला लाभ होईल.

फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्यात आलेले अपयश केकेआरसाठी महत्त्वाची अडचण ठरली आहे. तिसऱ्या वेगवान गोलंदाजाऐेवजी केकेआर संघ फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता आहे. युवा शुभमान गिल, इयोन मॉर्गन, नितीश राणा आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. मुख्य फिरकीपटू सुनील नारायणच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. आंद्रे रसेलचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय ठरतो.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सIPL 2020