Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2020 Final : अंतिम सामन्याच्या आधी मुंबई इंडियन्ससाठी सचिन तेंडुलकरचा खास संदेश

आयपीएल २०२०चा अंतिम सामना मंगळवारी सायंकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. त्या आधी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सच्या संघाला संदेश दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 15:41 IST

Open in App

आयपीएल २०२०चा अंतिम सामना मंगळवारी सायंकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. त्या आधी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सच्या संघाला संदेश दिला आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मिडीया पेजवर शेअर केलेल्या व्हिडियोत सचिन तेंडुलकरने सांगितले की, संघ व्यवस्थापनच नाही तर मुंबई इंडियन्सचे मालक आणि चाहते देखील संघाला सातत्याने सपोर्ट करत आहेत.  जेव्हा तुम्हाला माहित आहे की, सर्वच जण तुमच्या मागे उभे आहेत. तेव्हा तुम्ही एकटे नसतात. तर पुर्ण ताकद तुमच्या मागे असले त्यातूनच तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम देऊ  शकतात. ’

सचिन याने म्हटले की, सर्वात महत्त्वाचे आहे की हे एक कुटुंब आहे. आव्हान आणि उतार चढाव येतच राहतील. या स्पर्धेत सर्वच संघ वेगाने पुढे जात आहेत. अशा परिस्थितीत सर्व मजबुतीने एकसाथ आहोत. आणि त्यानेच आम्ही नक्कीच यशस्वी होऊ.’  मुंबईच्या संघाने आतापर्यंत चार आयपीएल सत्रात जेतेपद पटकावले आहे. मंगळवाळच्या सामन्यात पाचवे जेतेपद पटकावण्याच्या इराद्यानेच मुंबईचा संघ मैदानात उतरेल. तर दुसरीकडे दिल्ली  कॅपिटल्सचा युवा संघ आहे. त्यांनी आतापर्यंत एकही जेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचल्यावर जेतेपदासाठी ते उत्सुक आहेत.  

टॅग्स :IPL 2020सचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स