आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्याच एका अनोख्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलच्या सर्व सत्रातील अंतिम सामन्यात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या आपल्या विक्रमासोबत मुंबईने बरोबरी साधलीआहे. मुंबईने २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरोधात कोलकात्यात झालेल्या सामन्यात १ बाद ६१ धावा केल्या होत्या. आताही मुंबईने दुबईत दिल्ली कॅपिटल्स विरोधात खेळताना १ बाद ६१ धावाच केल्या आहेत.
या सामन्यात पहिल्या सहा षटकांत रोहित शमार्ने २४ तर सुर्यकुमार यादवने १३ धावा केल्या होत्या. तर डीकॉकने २० धावा केल्या. स्टेओनिसने डी कॉकला बाद केले.
आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पॉवरप्ले मधील कामगिरी ५९/० आरसीबी वि. सनरायजर्स बंगळुरू २०१६
५९/० सनरायजर्स वि. आरसीबी बंगळुरू २०१६
५९/१ केकेआर वि. किंग्ज इलेव्हन पंजाब २०१४
६१/१ मुंबई वि. दिल्ली दुबई २०२०
६१/१ मुंबई वि. सीएसके कोलकाता २०१५