ठळक मुद्देहे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल२०२० ची फायनल अहमदाबाद येथे होणाऱ्या नव्या स्टेडियममध्ये होणार अशी चर्चा होती. पण यंदाच्या आयपीएलची फायनल अहमदाबाद नाही तर एका मोठ्या शहरात रंगणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे.

आयपीएल २०२०चा लिलाव संपल्यानंतर आता आयपीएलचे वेळापत्रक ठरवले जात आहे. यावेळी आयपीएलचा सामना हा जगभरातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये व्हावी, अशी मागणी जोर धरू लागत होती. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमवर पहिला सामना मोठा व्हायला हवा, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिम फेरीचा सामना या जगतील सर्वात मोठ्या मैदानात व्हायला हवा, असे चाहत्यांना वाटत होते.
![IPL final match at one of the largest stadiums in the world will witness one lakh spectators | जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणार आयपीएलचा अंतिम सामना, एक लाख प्रेक्षक होणार साक्षीदार]()
जगताील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एक लाख प्रेक्षक बसू शकतात. पण आता काही दिवसांमध्येच जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारतामध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.
![world largest stadium will now be in India; The first match will be in March | जगातील सर्वात मोठे स्टेडियम आता भारतात होणार; मार्चमध्ये होणार पहिला सामना]()
गुजरातमधील अहमदाबाद येथे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनवले जात आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७मध्ये या स्टेडियमच्या बांधणीला सुरुवात झाली होती. आता काही दिवसांमध्ये हे स्टेडियम सज्ज होणार आहे. हे स्टेडियम ६३ एकर जागेमध्ये बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ५० खोल्याही येणार आहेत. त्याचबरोबर ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल असून ७३ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. त्याचबरोबर तीन प्रॅक्टीस मैदानंही बनवण्यात आली आहेत.
आयपीएलचा यंदाचा मोसमातील अंतिम सामना मुंबईमध्ये होणार आहे, असे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले आहे.