Join us

IPL 2020 Final : अंतिम सामन्यात ‘हा’ स्टार करणार नाही बॉलिंग; रोहित शर्माने दिली माहिती

मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी तर मजबूत आहेच, पण त्या जोडीला क्षेत्ररक्षणातही मुंबईकर चपळ आहेत. त्यामुळेच आज होणाºया Indian Premier League (IPL 2020) अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सपुढे (Delhi Capitals) तगडे आव्हान असणार हे नक्की.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 15:50 IST

Open in App

मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी तर मजबूत आहेच, पण त्या जोडीला क्षेत्ररक्षणातही मुंबईकर चपळ आहेत. त्यामुळेच आज होणाऱ्या Indian Premier League (IPL 2020) अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सपुढे (Delhi Capitals) तगडे आव्हान असणार हे नक्की. त्यातही मुंबईने सहाव्यांदा आयपीएल अंतिम फेरी गाठली असून दिल्लीने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, तरी मुंबईला या अत्यंत निर्णायक सामन्यात आपल्या एक स्टार खेळाडूच्या गोलंदाजीला मुकावे लागेल. स्वत: कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ही माहिती दिली आहे.

आक्रमक फलंदाज, भेदक गोलंदाज व कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद असलेले तीन जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मुंबईकडे आहेत. त्यामुळेच मुंबईचा संघ स्पर्धेतील सर्वात समतोल संघ मानला जातो. परंतु, असे असले तरी मुंबईला यंदा पहिल्या सामन्यापासून आपल्या एका खेळाडूच्या गोलंदाजीपासून मुकावे लागले आहे. हा स्टार खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या (Hardik Pandya).

पाठिच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेल्या हार्दिकने यंदा बॅटने अपेक्षित आक्रमक खेळी केली. परंतु, गोलंदाजीपासून त्याला दूर रहावे लागले आहे. अंतिम सामन्यात तो गोलंदाजी करेल, असे वाटत होते. परंतु, आता कर्णधार रोहित शर्मानेच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

रोहित म्हणाला की, ‘हार्दिकला गोलंदाजी करताना अडचण येत असल्याने तो गोलंदाजीपासून दूर आहे. आम्ही 3-4 सामन्यांचे विश्लेषण केल्यानंतरही या गोष्टीला स्वीकार केले आहे. त्यावेळी आम्ही हार्दिकसोबत चर्चाही केली की, त्याला काय करायचे आहे. सध्या तो सहजपणे गोलंदाजी करु शकत नाहीए. जर त्याला कोणतीही अडचण आली नाही, तर तो कधीही गोलंदाजी करु शकतो.’

हार्दिकच्या अडचणीविषयी रोहित म्हणाला की, ‘सध्या त्याला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर तो गोलंदाजी करत असता, तर फार चांगले ठरले असते. यंदा आम्ही त्याला पूर्ण मोकळीक दिली आहे, जेणेकरुन तो आपल्या तंदुरुस्तीची अधिक काळजी घेईल. आतापर्यंत त्याने खूप चांगले प्रदर्शन केले आहे. 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सरोहित शर्मादिल्ली कॅपिटल्सहार्दिक पांड्या