Join us

IPL 2020 : दिनेश कार्तिकचं भवितव्य ठरलं; KKRच्या प्रशिक्षकांची मोठी घोषणा

दिनेशचा फॉर्म पाहता आणि गतमोसमातील त्याच्या नेतृत्वाखाली संघाची फार समाधानकारक नव्हती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 18:26 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमात कोलकाता नाइट रायडर्सनं नेतृत्वाची जबाबदारी दिनेश कार्तिक एवजी शुबमन गिल याच्याकडे द्यावी, अशी मागणी माजी कसोटीपटू गौतम गंभीरनं केली होती. दिनेशचा फॉर्म पाहता आणि गतमोसमातील त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी पाहता ही मागणीही रास्त होती. दिनेशचं भवितव्य ठरवणारी घोषणा गुरुवाती कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांनी केली. दिनेशच पुढल्या मोसमात KKRचे कर्णधारपद भूषविणार असं मॅकलम यांनी स्पष्ट केले. 

2018 मध्ये दिनेशला कोलकाता नाइट रायडर्सनं करारबद्ध केलं. गौतम गंभीरकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत संघ व्यवस्थापनानं दिनेशला कर्णधार बनवलं. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं प्ले ऑफपर्यंत मजल मारली.    

टॅग्स :आयपीएल 2020कोलकाता नाईट रायडर्सगौतम गंभीरदिनेश कार्तिक