Join us

IPL 2020 CSK vs KXIP: चेन्नईची विजयी डरकाळी; पंजाबचा १० गड्यांनी धुव्वा

IPL 2020 CSK vs KXIP: वॉटसन-डूप्लेसिस यांची शतकी भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:56 IST

Open in App

दुबई : आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या शेन वॉटसनने शानदार खेळ करत फाफ डूप्लेसिससह १८१ धावांची जबरदस्त नाबाद भागीदारी केली. या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने पराभवाची मालिका खंडीत करत किंग्ज ईलेव्हन पंजाबचा १० गड्यांनी पराभव केला. सलग तीन सामने गमावलेल्या चेन्नईसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता.वॉटसनने ५३ चेंडूंत नाबाद ८३ आणि फाफ डूप्लेसिसने ५३ चेंडूंत नाबाद ८७ धावा करत पंजाबच्या आव्हानातली हवाच काढली. दोघांनी कोणतेही धोकादायक फटके न मारता पंजाबला नमवले. त्याआधी, लोकेश राहुल-मयांक अग्रवाल या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतरही पंजाबला समाधानकारक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. राहुलने ५२ चेंडूंत ६३ धावांची भक्कम खेळी केली. पूरनने १७ चेंडूंत ३३ धावांचा तडाखा देत एकवेळ पंजाबच्या धावगतीला कमालीचा वेग दिला होता. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने पूरन व राहुल यांना एकाच षटकात बाद करत पंजाबच्या वेगवान वाटचालीला ब्रेक दिला.धोनीचे 100 झेल पूर्णचेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पंजाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत आपल्या आयपीएल कारकिर्दीत १०० झेल टिपण्याचा पराक्रम केला. यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक झेल टिपणाऱ्यांमध्ये कोलकाताचा दिनेश कार्तिक सध्या आघाडीवर आहे. त्याने १०३ झेल टिपले आहे. सध्या १८८ सामने खेळणाºया धोनीच्या नावावर सर्वाधिक ३९ स्टंपिंगची नोंद आहे.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सकिंग्स इलेव्हन पंजाबशेन वॉटसनमहेंद्रसिंग धोनी