Join us  

IPL 2020 : पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंवर टीका करणाऱ्यांना माजी क्रिकेटपटूने सुनावले

चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटू, समालोचक, क्रीडातज्ज्ञ इतकंच काय, इतर खेळांमधील आजी-माजी खेळाडूंनीही या ‘सुटलेल्या’ क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत वक्तव्य करुन टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 4:26 PM

Open in App

शनिवारपासून आयपीएलच्या १३व्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या पहिल्या लढतीत चेन्नईने बाजी मारत दिमाखात सुरुवात केली. मात्र या सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा त्यांच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक क्रिकेटपटूंचे पोट लॉकडाऊनदरम्यान सुटलेले दिसले आणि त्यामुळेच सोशल मीडियावर सुरु झाली ती ढेरी सुटलेल्या क्रिकेटपटूंची. ( IPL 2020 Live Updates, Click here)  

 ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटू, समालोचक, क्रीडातज्ज्ञ इतकंच काय, इतर खेळांमधील आजी-माजी खेळाडूंनीही या ‘सुटलेल्या’ क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत वक्तव्य करुन टीका केली. मात्र यामध्ये आता भारताचे माजी क्रिकेटपटू विजय भरद्वाज यांनीही उडी घेतली असून त्यांनी या सुटलेल्या क्रिकेटपटूंची बाजू घेत टीका करणाºया सर्व व्यक्तींना चांगलेच सुनावले आहे. एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाशी संवाद साधताना भारद्वाज म्हणाले की, ‘पहिल्या सामन्यात अनेकांनी पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंवर टीका केली. मान्य आहे क्रिकेट्पटूंनी त्यांच्या फिटनेसवर मेहनत न घेतल्याचे दिसून आले. पण सध्याची परिस्थिती पाहता या खेळाडूंवर टीका करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.’

‘प्रत्येकजण आपल्या करकिर्दीत कठीण प्रसंगातून मार्गक्रमण करत असतो. त्यामुळेच सध्या क्रिकेटपटूंच्या फिटनेसवर होत असलेली प्रतिक्रिया आणि टीका पाहून दु:ख होते. सध्या यातून टीकाकारांची असंवेदनशीलता दिसून येते. नक्कीच काही क्रिकेटपटूंच्या पोटाचा घेर वाढलेला आहे, पण त्यांनी साधारण जीवन जगण्यास आता सुरुवात केली आहे आणि हे या महामारीच्या दिवसांमध्ये सोपे नव्हते. त्यामुळेच सध्याच्या या परिस्थितीमध्ये सर्वांनी क्रिकेटपटूंच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. दुसºयांचे मानसिक खच्चीकरण करुन काय मिळणार. हे चुकीचे आहे. आयपीएल स्पर्धेचा असलेला आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेऊन फिटनेस नक्कीच गरजेची आहे. पण आज प्रत्येकजण कठीण प्रसंगातून जात आहे आणि त्यामुळे टीका न करताना खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे,’ असेही भरद्वाज यांनी सांगितले.   

अन्य म्हत्त्वाच्या बातम्या 

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार 

नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद 

तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स