IPL 2020 : रोहित मैदानात, बीसीसीआय निवड समिती वादात

Rohit Sharma : बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणाले,‘बोर्ड रोहितसारख्या खेळाडूच्या मैदानावरील पुनरागमनासाठी शक्य तेवढे प्रयत्न करेल. कारण ती बोर्डाची जबाबदारी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 06:08 AM2020-11-04T06:08:44+5:302020-11-04T06:09:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: BCCI selection committee debates at Rohit on Ground | IPL 2020 : रोहित मैदानात, बीसीसीआय निवड समिती वादात

IPL 2020 : रोहित मैदानात, बीसीसीआय निवड समिती वादात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 - राम ठाकूर

नवी दिल्ली : भारताचा सिनियर सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) प्ले-ऑफमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे खेळण्याचा निर्णय सावधगिरीने घ्यायला हवा. कारण त्याच्या स्नायूची दुखापत बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले. रोहित किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दुसऱ्या फेरीच्या लढतीनंतर स्नायूच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळेच त्याला या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात  स्थान देण्यात आलेले नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणाले,‘बोर्ड रोहितसारख्या खेळाडूच्या मैदानावरील पुनरागमनासाठी शक्य तेवढे प्रयत्न करेल. कारण ती बोर्डाची जबाबदारी आहे. मुंबई इंडियन्सला गुरुवारी प्ले-ऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. गांगुली पुढे म्हणाले,‘ रोहित सध्या दुखापतग्रस्त आहे. 

रोहित शर्मा मंगळवारी हैदराबादविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात मैदानात आला. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा हा खेळाडू केवळ चार धावा काढून माघारी फिरला. मात्र यानिमित्ताने प्रश्न उपस्थित झाला तो त्याच्या जखमेचा.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सामन्याच्या काही तासांआधीच रोहितने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा विचार न करता भविष्यावर लक्ष केंद्रित करून फिट होण्यास प्राधान्य द्यावे, तरच राष्ट्रीय संघात त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे संकेत दिले होते. यादृष्टीने रोहितचे मैदानावरील आगमन आश्चर्यकारक वाटले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आले नव्हते. गावसकर यांनी निवडकर्त्यांवर याआधीच मौन बाळगल्याचा आरोप केला होता. जखमी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव कसा काय करू शकतो, असा गावसकरांचा प्रश्न होता. तो सराव करीत असेल तर नक्कीच फिट आहे. मैदानावर उतरताच रोहितने स्वत:च्या फिटनेसचा पुरावा दिला.’

मी फिट आणि फाईन 
नाणेफेकीसाठी आलेल्या रोहितला ॲंकरने ‘सर्व काही ठीक आहे का,’ असा सवाल केला तेव्हा रोहित म्हणाला, ‘मी फिट आणि फाईन आहे,’ असे दिसत नाही काय! आम्ही काही प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देत आहोत. मी स्वत: जयंत यावदच्या जागी खेळत आहे.

Web Title: IPL 2020: BCCI selection committee debates at Rohit on Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.