कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे रोहित शर्माही मुंबईतील घरातच आहे. फेब्रुवारीतील न्यूझीलंड दौऱ्यानंतर रोहित क्रिकेटपासून दूर आहे. आता पुढील महिन्यात रोहित मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) रोहितची बॅट तळपताना पाहण्यासाठी सर्व आतूर आहेत. रोहितही दमदार फटकेबाजीसाठी सज्ज झाला असून मुंबई इंडियन्सनं त्याचा सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आयपीएलच्या 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं त्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक 4 जेतेपदं पटकावली आहेत. गतवर्षी त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला नमवून चौथे जेतेपद नावावर केलं होतं. आता यूएईत जेतेपद कायम राखण्याचं त्यांचं लक्ष आहे.
पाहा व्हिडीओ...