Join us  

IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी!

IPL 2020 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 4000 कोटींचा फटका सहन करावा लागला असता. पण, खेळाडूंनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला असता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 1:43 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) मार्ग अखेरीस मोकळा झाला. आयपीएलचा 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार असल्याचे गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. अजूनही आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची बीसीसीआयला प्रतीक्षा आहे. येत्या आठवड्यात तेही चित्र स्पष्ट होईल आणि आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. आयपीएल झाली नसती तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 4000 कोटींचा फटका सहन करावा लागला असता. पण, खेळाडूंनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला असता. 

आयपीएल ही भारतीय खेळाडूंच्या अधिक फायद्याची आहे, यात काही दुमत नाही. त्यामुळे आयपीएलमधून मिळणारे उत्पन्नावर पाणी फिरावे, असे कुणालाच वाटणार नाही. यंदाच्या आयपीएलमधून 125 भारतीय क्रिकेटपटूंना 358.25 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना 197 कोटी मिळणार आहेत. यात सर्वाधिक रक्कम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला मिळणआर आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक येतो. या दोघांना अनुक्रमे 17 व 15 कोटी मिळणार आहेत. 

युवा वर्ल्ड कप गाजवणारे 'हे' शिलेदार आता IPL 2020 मध्ये कमाल दाखवणार

  • ऑस्ट्रेलियाचे - 17 खेळाडू - एकूण रक्कम 86 कोटी 75 लाख 

यंदाच्या आयपीएलमध्ये 8 विविध संघात ऑस्ट्रेलियाचे 17 खेळाडू खेळणार आहेत. पॅट कमिन्सला आयपीएल लिलावात सर्वाधिक 15.5 कोटींची बोली लावून कोलकाता नाइट रायडर्सनं आपल्या ताफ्यात घेतलं. पण, ही रक्कम मिळवण्यासाठी त्याला आयपीएलमध्ये खेळावे लागेल.  (IPL लिलावात पॅट कमिन्स मालामाल अन् गर्लफ्रेंडनं सांगितले खर्चाचे भन्नाट प्लान्स)

  • वेस्ट इंडिज - 10 खेळाडू, एकूण रक्कम - 49 कोटी 75 लाख
  • इंग्लंड - 13 खेळाडू, एकूण रक्कम - 47 कोटी 50 लाख
  • अफगाणिस्तान - 3 खेळाडू, एकूण रक्कम - 14 कोटी
  • न्यूझीलंड - 6 खेळाडू, एकूण रक्कम - 9 कोटी 80 लाख
  • श्रीलंका - 2 खेळाडू, एकूण रक्कम - 2 कोटी 50 लाख
  • नेपाळ - 1 खेळाडू, एकूण रक्कम - 20 लाख 

IPL Auction 2020 : पॅट कमिन्स ते सॅम कुरण... विविध संघांनी खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात! 

KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!

शॉक लगा... पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत घेतला सेल्फी, नंतर माहीत पडलं त्याला कोरोना झालाय!

एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020