KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!

95 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 342 धावा आणि 71 विकेट्स घेतल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:11 AM2020-07-29T11:11:14+5:302020-07-29T11:11:44+5:30

whatsapp join usJoin us
Rajat Bhatia announces retirement from all forms of cricket | KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!

KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) संघाला 2012मध्ये इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) पहिले जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या खेळाडूनं बुधवारी निवृत्ती जाहीर केली. दिल्लीच्या या खेळाडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6482 धावा आणि 137 विकेट्स घेतल्या आहेत. 

शॉक लगा... पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत घेतला सेल्फी, नंतर माहीत पडलं त्याला कोरोना झालाय!

दिल्लीच्या 2008च्या रणजी विजेत्या संघाचा तो सदस्य होता आणि उत्तर प्रदेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यानं 139 धावांची नाबाद खेळी केली होती. 1999-2000मध्ये त्यानं तामिळनाडूसाठी त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या 2012च्या विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या या खेळाडूनं 95 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 342 धावा आणि 71 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 3038 धावा आणि 93 विकेट्स आहेत. ( Rajat Bhatia announces retirement from all forms of cricket)

रजत भाटीया असे निवृत्ती घेतलेल्या खेळाडूचं नाव आहे. त्यानं आयपीएलच्या पहिल्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाचे प्रतिनिधित्व केले. तीन वर्ष दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर 2011च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली त्यानं आयपीएलचं जेतेपद जिंकलं. 2014मध्ये राजस्थान रॉयल्स संघानं 1.7 कोटीत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. काही वर्षांनंतर 2016मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. 10 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत त्यानं अनेक अविस्मरणीय खेळी केल्या.  

एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!

Web Title: Rajat Bhatia announces retirement from all forms of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.