आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक लहानगी चाहत्यांमध्ये बसून एक बोर्ड दाखवत होती. ती लहानगी होती हैदराबादच्या संघातील डेव्हिड वॉर्नरची मुलगी आणि तिच्या मुलीने हातात गो डॅडी... असा बोर्ड धरला होता.
पाहा हा व्हिडीओ
IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ
आयपीएल २०१९ : आयपीएलच्या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता असते. आयपीएलचे चाहते सर्व वयोगटांमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भेटायला एक आज्जीबाई आल्या होत्या. आता तर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भेटायला एक नन्ही परी आल्याचे पाहायला मिळाले.
सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नर सराव करत होता. त्यावेळी एका नन्ही परीने त्याला आवाज दिला. वॉर्नरचे पायही तिच्याकडे वळले. ती नन्ही परी होती वॉर्नरची मुलगी. वॉर्नर तिच्याकडे वळल्यावर तिने आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.