Join us

IPL 2019 : स्मिथ, वॉर्नर यांची वर्ल्ड कप संघातील निवड राजस्थान व हैदराबादसाठी डोकेदुखी 

IPL 2019: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 13:16 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. 15 सदस्यीय संघात अपेक्षेप्रमाणे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना संधी देण्यात आली आहे. स्मिथ आणि वॉर्नर हे दोघेही सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वर्ल्ड कप संघातील समावेशामुळे या दोघांनाही राष्ट्रीय कर्तव्यावर जावे लागणार आहे आणि त्यामुळे आयपीएलच्या अंतिम टप्प्यातून ते माघार घेण्याची शक्यता आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार वर्ल्ड कप संघातील 15 खेळाडूंना ब्रिस्बन येथे आयोजित सराव सत्रात सहभागी व्हावे लागणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ तीन अनऑफिशीयल वन डे सामने खेळणार आहे. हे सराव सत्र 2 मे ला भरणार आहे. आयपीएलमध्ये वॉर्नरची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने 7 सामन्यांत 80 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान स्मिथला अद्याप हवा तसा सूर गवसलेला नाही. 

सलामीचा तिढानुकत्याच झालेल्या मालिकेत अ‍ॅरोन फिंच आणि उस्मा ख्वाजा यांनी सलामीची जबाबदारी स्वीकारली होती. पण वॉर्नरच्या समावेशामुळे वर्ल्ड कपमध्ये सलामीला कोण येणार याची उत्सुकता आहे. शॉन मार्श, स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. अ‍ॅडम झम्पा आणि नॅथन लियॉन या दोन फिरकीपटूंसह पाच जलदगती गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. पॅट कमिन्स आणि २०१५ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील नायक मिचेल स्टार्क यांचे कमबॅक होत आहे. 

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ : अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅलेक्स करी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथनकोल्टर नायल, जेसन बेहरेनडोर्फ, नॅथन लियॉन, अ‍ॅडम झम्पा.

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९आयपीएल 2019स्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नरराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद