Join us

Ipl 2019 SRH vs MI live update : मुंबईचा हैदराबादवर 40 धावांनी विजय

हैदराबाद, आयपीएल 2019 : हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने गुणतािलिकेत चौथे स्थान पटकावले आहे. यापूर्वी मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 23:49 IST

Open in App

06 Apr, 19 11:37 PM

मुंबईचा दमदार विजय

अल्झारी जोसेफच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनेसनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादला करता आला नाही आणि मुंबईने 40 धावांनी दमदार विजय मिळवला. अल्झारीने भेदक मारा करत फक्त 12 धावांमध्ये सहा धावा केल्या.

06 Apr, 19 11:14 PM

हैदराबादला सातवा धक्का

रशिद खानच्या रुपात हैदराबादला सातवा धक्का बसला. रशिदला एकही धाव करता आली नाही.

06 Apr, 19 11:10 PM

हैदराबादला सहावा धक्का

दीपक हुडाच्या रुपात हैदराबादला सहावा धक्का बसला. हुडाला 20 धावा करता आल्या.

06 Apr, 19 10:51 PM

हैदराबादला पाचवा धक्का

युसूफ पठाणच्या रुपात हैदराबादला पाचवा धक्का बसला. युसूफला भोपळाही फोडता आला नाही.

06 Apr, 19 10:47 PM

हैदराबादला चौथा धक्का

मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला चौथा धक्का बसला, त्याने 16 धावा केल्या.

06 Apr, 19 10:34 PM

हैदराबादला तिसरा धक्का

विजय शंकरच्या रुपात हैदराबादला तिसरा धक्का बसला. शंकरला पाच धावा करता आल्या.

06 Apr, 19 10:23 PM

हैदराबादला दुसरा धक्का

डेव्हिड वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. वॉर्नरने 15 धावा केल्या.

06 Apr, 19 10:20 PM

जॉनी बेअरस्टोव आऊट

जॉनी बेअरस्टोवच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला.

06 Apr, 19 09:32 PM

राहुल चहार आऊट

चहारच्या रुपात मुंबईला सातवा धक्का बसला. चहारला 10 धावा करता आल्या.

06 Apr, 19 09:26 PM

मुंबईला सहावा धक्का

हार्दिक पंड्याच्या रुपात मुंबईला सहावा धक्का बसला. हार्दिकला 14 धावा करता आल्या.

06 Apr, 19 09:08 PM

इशान किशन आऊट

इशान किशनच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का बसला. इशान किशनने 17 धावा केल्या.

06 Apr, 19 09:00 PM

कृणाल पंड्या आऊट

कृणालच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला. कृणालला सहा धावा करता आल्या.

06 Apr, 19 08:52 PM

मुंबईचे अर्धशतक पूर्ण

दहाव्या षटकात मुंबईने आपले अर्धशतक पूर्ण केले.

06 Apr, 19 08:41 PM

क्विंटन डी' कॉक आऊट

डी' कॉकच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. डी' कॉकला 19 धावा करता आल्या.

06 Apr, 19 08:32 PM

सूर्यकुमार यादव आऊट

सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला दुसरा धक्का बसला. यादवला सात धावा करता आल्या.

06 Apr, 19 08:21 PM

मुंबईला पहिला धक्का

रोहितला शून्यावर जीवदान मिळाले असले तरी त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. मोहम्मद नबीने रोहितला 11 धावांवर बाद केले.

06 Apr, 19 08:08 PM

रोहित शर्माला जीवदान

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पहिल्याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर जीवदान मिळाले.

06 Apr, 19 07:58 PM

IPL 2019 : सनरायझर्स हैदराबादने आपल्या 'लकी चार्म'ला दिले खास सरप्राइज



 

06 Apr, 19 07:48 PM

हैदराबादने नाफेफेक जिंकली

हैदराबादने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले.

टॅग्स :मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल 2019