Join us

IPL 2019 : सौरव गांगुलीची दमदार फटकेबाजी; पाहा व्हिडीओ

IPL 2019: सौरव गांगुली सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 17:24 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचा संघ पहिले आयपीएल जेतेपद पटकावण्यासाठी आतुर आहे. 

आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स संघाकडून खेळलेल्या गांगुलीनं दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात गुरुवाती दमदार फटकेबाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गांगुलीनं बॅट हातात घेतल्यावर चाहत्यांना आनंद झाला. गांगुलीनेही कट शॉट्स आणि कव्हर ड्राईव्ह लगावत चाहत्यांना खूश केले. दिल्ली कॅपिटल्सने गांगुलीच्या फटकेबाजीचा व्हिडीओ शेअर केला.दिल्लीनं आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवले, परंतु दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. शनिवारी दिल्ली घरच्या मैदानावर कोलकाताचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यासाठी गांगुलीनं संघातील खेळाडूंकडून कसून सराव करून घेतला.

गांगुलीने भारतीय संघाकडून 311 वन डे सामन्यांत 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत आणि त्यात 22 शतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 113 कसोटी सामन्यांत 7212 धावा आहेत, तर आयपीएलमध्ये 59 सामन्यांत 1349 धावा आहेत.  

टॅग्स :सौरभ गांगुलीदिल्ली कॅपिटल्सआयपीएल 2019