Join us  

IPL 2019 : 'संकटमोचक' सिद्धेश लाडचे मुंबई इंडियन्सकडून पदार्पण

सिद्धेशकडे मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्वही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 7:35 PM

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : आतापर्यंत मुंबईच्या रणजी संघासाठी तारहार ठरलेल्या सिद्धेश लाडला आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सिद्धेशला संघाची कॅप दिली आणि तेव्हाच सिद्धेश या सामन्यात खेळणार यावर शिक्कामोर्तब झाले.

सिद्धेशने आतापर्यंत मुंबईला बरेच रणजी सामने जिंकवून दिले आहे. त्याचबरोबर सिद्धेशकडे मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्वही आहे. पण बऱ्याच दिवसांपासून बेंचवर बसलेल्या सिद्धेशला आज मुंबई इंडियन्सकडून पादर्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची वर्णीमहाराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या रणजी क्रिकेट सामन्यासाठी मुंबईच्या कर्णधारपदी संकटमोचक सिद्धेश लाडची निवड करण्यात आली आहे. हा सामना 6 ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्यात होणार आहे.

मुंबईला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार असलेल्या धवल कुलकर्णीला संघातून डच्चू देण्यात आला आहे. धवलच्या जागी आता मुंबईचे नेतृत्व सिद्धेशकडे सोपवण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माआयपीएल 2019किंग्ज इलेव्हन पंजाब