IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला

IPL 2019: मुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिला सामना आज खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 18:27 IST2019-03-24T18:26:36+5:302019-03-24T18:27:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2019: Rohit Sharma's daughter gets a special gift from Mumbai Indians | IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला

IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिला सामना आज खेळणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा सामना करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या कन्येला खास गिफ्ट दिले आहे. मुंबई इंडियन्सने समायराला दिलेले हे गिफ्ट पाहून रोहितही भारावला. 

भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं . काही दिवसांपूर्वई या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आणि त्याला कारण त्यांची तीन महिन्यांची समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रोहितला मुलीला अधिकाधिक वेळ देण्याची संधी मिळत आहे आणि हिटमॅन त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. तो शक्य तितका वेळ समायराला देत आहे आणि सोशल मीडियावर या बाप लेकीच्या आठवणी शेअर करत आहे. शनिवारी रोहितनं समायरा सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात चक्क रोहित समायरासाठी रॅप साँग गाताना दिसत आहे. बापमाणूस रोहितनं केलेला हा प्रयत्न नेटिझन्सनाही चांगलाच आवडला होता.  



आज मुंबई इंडिन्सने समायसाठी खास मुंबई इंडियन्सची जर्सी गिफ्ट केली. 

Web Title: IPL 2019: Rohit Sharma's daughter gets a special gift from Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.