मुंबई, आयपीएल २०१९ : आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईला लसिथ मलिंगाच्या रुपात धक्का बसला आहे. पण यापुढच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. कारण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर 12 लाखांचा दंड भरावा लागला. शनिवारी मोहालीत झालेल्या या सामन्यात यजमान पंजाबने 8 विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे मोहालीतील 8 वर्षांची मुंबई इंडियन्सची विजयी मालिकाही खंडीत झाली. यात भर म्हणून रोहितवर दंडात्मक कारवाई झाली. या सामन्यात षटकांचा वेग न ( स्लो ओव्हर रेट) राखल्यानं रोहितला हा दंड भरावा लागला.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. षटकांची गती कमी राखल्याबद्दल त्याला हा दंड ठोठावण्यात आला होता. पण यापुढे जर रोहितकडून ही चूक पुन्हा घडली तर रोहितवर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. त्यामुळे ही मुंबईसाठी मोठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
काय आहे नियमजर एका संघाने षटकांची योग्य गती राखली नाही तर त्या संघाच्या कर्णधाराला दंड ठोठावण्यात येतो. पण हीच चूक दुसऱ्यांदा घडली तर त्या कर्णधारावर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. यापूर्वी बऱ्याचदा मुंबईने षटकांची गती कमी राखलेली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला धक्का, लसिथ मलिंगा मायदेशी परतला