IPL 2019 : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार?

IPL 2019: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 16:46 IST2019-04-12T16:45:50+5:302019-04-12T16:46:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2019: Rohit sharma is very positive right now, This is a good sign for us, Zaheer khan | IPL 2019 : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार?

IPL 2019 : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार?

मुंबई, आयपीएल 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला होता आणि या सरावात रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पंजाबविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्डने 31 चेंडूंत 10 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर 83 धावांची तुफानी खेळी साकारली. पोलार्डच्या या खेळीमुळेच मुंबईला पंजाबवर तीन विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

सराव सत्रात रोहित लंगडत चालताना दिसत होता आणि त्याने सराव सत्रातूनही विश्रांती घेतली. धावण्याचा सराव करतान रोहितचा पाय मुरगळला आणि वेदनेने कळवळत त्याने मैदानावरच लोटांगण घातले. मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांनी त्वरीत मैदानावर धाव घेत रोहितवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रोहित ड्रेसिंग रुममध्ये परतला. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, शनिवारी मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.



रोहितच्या फिटनेसबाबत संघाचा सल्लागार झहीर खान म्हणाला,''रोहितने शुक्रवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सहभाग घेतला. तो पूर्णपणे तंदुरूस्त दिसत आहे आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी तो उत्सुक आहे. अंतिम निर्णय संघ निवड समिती घेईल. पण, मला विचाराल तर रोहित फिट आहे.''

Web Title: IPL 2019: Rohit sharma is very positive right now, This is a good sign for us, Zaheer khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.