Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : रिषभ पंतची तुफानी खेळी, २६ चेंडूंत ७८ धावा

पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 22:12 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतची तुफानी खेळी वानखेडेवर पाहायला मिळाली. पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७८ धावांची खेळी साकारली. पंतच्या या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २१३ धावा करता आल्या.

 

 

 

 मुंबई इंडियन्सपुढे मुंबईकर फेल

या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर होणार असला तरी त्यांना मुंबईकर क्रिकेटपटूंशीच दोन हात करत आहे. दिल्लीच्या संघात कर्णधार श्रेयस अय्यर आणि  पृथ्वी शॉ हे दोन मुंबईचेच खेळाडू आहेत. पण मुंबई इंडियन्सपुढे हे दोघेही फेल झाल्याचे पाहायला मिळाले.

पृथ्वी आणि श्रेयस यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली होती. पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. पृथ्वी यावेळी सात धावांवर बाद झाला, तर श्रेयसने १६ धावा केल्या. पृथ्वी आणि श्रेयस हे वानखेडे स्टेडियमवरच मोठे झाले, पण या मैदानात आज त्यांना मोठी खेळी साकारण्यात अपयश आले.

टॅग्स :रिषभ पंतआयपीएल 2019मुंबई इंडियन्स