Join us

IPL 2019 : सात वर्षांपूर्वीही अश्विननं 'असंच' केलं होतं आउट, सचिननं दाखवली खिलाडूवृत्ती

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:26 IST

Open in App

जयपूर, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे. पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले. पण, त्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. अश्विनने सात वर्षांपूर्वीही फलंदाजाला असंच बाद केलं होतं. 

श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेन येथे झालेल्या कॉमनबेल्थ बँक वन डे सीरिजमधील सामन्यात अश्विनने लाहिरु थिरिमानेला मांकड नियमानुसार बाद केले होते. त्यावेळी संघातील सर्वात अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यांनी खिलाडूवृत्ती दाखवताना थिरिमानेविरुद्धची अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अश्विन संघातील कनिष्ठ सदस्य होता आणि त्याने नियमात राहून फलंदाजाला बाद केले होते. पण, वरिष्ठ खेळाडूंचे विचार वेगळे होते. पण, बटलरबद्दल बोलायचे झाल्यास 2014मध्ये तो अशाच प्रकारे बाद केले होते. श्रीलंकेच्या सचित्र सेनानायकेने त्या सामन्यात बटलरला आधी ताकीद दिली होती. पण, तरिही तो क्रीझ सोडून पुढे गेला. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही 1992 साली पीटर कर्स्टनला असेच बाद केले होते, परंतु त्यांनी कर्स्टनला ताकीद दिली होती. 

टॅग्स :आर अश्विनकिंग्ज इलेव्हन पंजाबसचिन तेंडुलकरराजस्थान रॉयल्सआयपीएल 2019