Join us

 IPL 2019 : लावला नेम आणि झाला त्याचाच गेम, मुंबई इंडियन्सचा खेळाडू होतोय ट्रोल

हा ट्रोल होणार मुंबई इंडियन्सचा खेळाडू कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 18:33 IST

Open in App

नवी दिल्ली : चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी खेळाडू बऱ्याच गोष्टी करतात आणि ट्विटरवर पोस्ट करतात. सध्या आयपीएल सुरु आहे. या दरम्यान बऱ्याच संघांच्या ट्विटर हँडलवर अशा गोष्टी पाहायला मिळतात. पण मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने अशीच एक वेगळी गोष्ट केली. मुंबई इंडियन्स ही गोष्ट आपल्या ट्विटरवर शेअर केली. त्यानंतर हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू चांगलाच ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू डार्ट्स गेम खेळत होता. या गेममध्ये एका लक्ष्य ठरवून त्यावर निक्षाणा लावायचा असतो. बऱ्याचदा एक गोल चक्रासारखी गोष्ट तुमच्या समोर काही अंतरावर ठेवली जाते आणि या चक्राच्या मध्यभागी तुम्हाला नेम लावायचा असतो. मुंबईच्या एका खेळाडूने न बघता नेम लावला आणि त्याचा तो नेम परफेक्ट मध्यभागी बसला. या गोष्टीचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर पोस्ट केला. यानंतर हा खेळाडू चांगलाच ट्रोल व्हायला लागला. काही जणांनी तर या खेळाडूच्या हातामध्ये काहीही नव्हते, तरी त्याचा योग्य नेम कसा लागला, अशी शंकाही उपस्थित केली आहे. आता तुम्हाला हा ट्रोल होणार मुंबई इंडियन्सचा खेळाडू कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. हा खेळाडू मुंबई इंडियन्स आणि मुंबईच्या रणजी संघातून खेळतो. काही वर्षांपूर्वी हा खेळाडू कोलकाता नाइट रायडर्सकडे होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात त्याला सामील करून घेतले आहे. मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू आहे सूर्यकुमार यादव.

हा पाहा मुंबई इंडियन्सचा व्हिडीओ

सूर्यकुमार कसा होतोय ट्रोल ते पाहा

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2019