Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : फायनलमध्ये धोनीच्या नावावर झाला 'हा' विक्रम

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 20:31 IST

Open in App

हैदराबाद, आयपीएल २०१९ : आयपीएलच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. पण या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

या सामन्यात तुफानी सुरुवात केली ती डीकॉकने. पण शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर दीपक चहरने रोहित शर्माला धोनीवकरवी झेलबाद केले आणि मुंबईला मोठा धक्का दिला. या विकेटसह धोनीने आपल्या नावावर एक विक्रम झाला आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये स्टम्पमागे सर्वाधिक झेल आणि यष्टीचीत करणारा धोनी सर्वोत्तम यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने रोहितचा झेल पकडत आयपीएलमध्ये १३२ फलंदाजांना बाद केले आहे. धोनीने यावेळी दिनेश कार्तिकला पिछाडीवर टाकले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2019मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स