मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद जिंकले आणि त्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक नुकतीच सुरु झाली आहे. या मुंबईच्या विजयी मिरवणूकीला पुणेरी साज चढल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या मिरवणूकीची सुरुवात झाली आहे ते पुणेरी ढोल-ताश्यांच्या गजरात.
पाहा हा खास व्हिडीओ
मुंबईच्या मिरवणूकीसाठी खास बस बनवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयी शिलेदारांनी खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता या मिरवणूकीला पेडर रोडपासून सुरुवात होईल आणि त्यानंतर ट्रायडंट हॉटेलपर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येतील.
अशी असेल मिरवणूक....
सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईल
मिरवणूकीतील सुरुवातीचा 400 मीटरचा प्रवास हा पुणेरी ढोलच्या गजरात काढण्यात येणार आहे
जस्लोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून बस ट्रायडंटच्या दिशेने नेण्यात येईल
त्यानंतर रात्री 9 वाजता अँटिलिया येथे खेळाडू, संघ मालक, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितील पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे .
... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काही मुलाखती झाल्या. पण रोहितची खास मुलाखत घेतली ती त्याची पत्नी रितिकाने. यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले.
रितिकाने विचारले की, " समायराच्या समोर मुंबईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतपद पटकावले आहे, याबद्दल तुला काय वाटते?" या प्रश्नावर रोहित म्हणाला की, " फक्त समायराच नाही तर तुझ्या उपस्थितीतही आम्ही जेतेपद पटकावले या गोष्टीचा आनंद आहे."
हा पाहा खास व्हिडीओ
रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल
आयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर मुंबई इंडियन्सने एका पबमध्ये आपला आनंद साजरा केल्याचे वृत्त आहे. या पबमधील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या रॅप डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांनी 'गली बॉय'च्या गाण्यावर डान्स केल्याचे या व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हा पाहा खास व्हिडीओ