मुंबई, आयपीएल २०१९ : आज सामना रंगणार आहे तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही दादा संघांमध्ये. या सामन्यात मुंबईला विजयाचा शतकोत्सव साजरा करण्याची संधी आहे. नेमके हे प्रकरण काय आहे, तुम्हाला माहिती आहे का...
आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबईने १७४ सामने खेळले आहेत. या १७४ सामन्यांमध्ये मुंबईला ७५ सामने गमवावले लागले आहेत, तर ९९ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नईवर त्यांनी या लढतीत मात केली तर तो त्यांचा शंभरावा विजय ठरणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ घरच्या मैदानात शतकोत्सव साजरा करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मुंबईच्या नावावर आहेत, तर या यादीमध्ये चेन्नईचे दुसरा आणि सनरायझर्स हैदराबादचा तिसरा कॅमांक लागतो. आतापर्यंत चेन्नईच्या संघाने १५१ सामने खेळले आहे, यामध्ये त्यांना ९३ सामन्यांमध्ये विजय आणि ५६ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादच्या संघाने आतापर्यंत ९६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना ५३ सामने जिंकता आले आहेत तर ४२ सामन्यांध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
रोहित शर्मावर येऊ शकते बंदी
काय आहे नियमजर एका संघाने षटकांची योग्य गती राखली नाही तर त्या संघाच्या कर्णधाराला दंड ठोठावण्यात येतो. पण हीच चूक दुसऱ्यांदा घडली तर त्या कर्णधारावर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. यापूर्वी बऱ्याचदा मुंबईने षटकांची गती कमी राखलेली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला धक्का, लसिथ मलिंगा मायदेशी परतला