IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

IPL 2019: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रविवारपर्यंत प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 14:50 IST2019-03-23T14:49:34+5:302019-03-23T14:50:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2019: Mumbai Indians Lasith Malinga to miss first six matches in IPL, for World Cup qualification | IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

ठळक मुद्देमुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना रविवारी लसिथ मलिंगाची पहिल्या सहा सामन्यांतून माघार

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्धाटनीय सामना रंगणार आहे. पण, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रविवारपर्यंत प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. मात्र, घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा याला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांत खेळता येणार नाही. श्रीलंकेच्या या दिग्गज गोलंदाजाला राष्ट्रीय कर्तव्यावर परतावे लागणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना श्रीलंकेच्या निवड समितीनं त्याला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे. 

गतवर्षी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या साहाय्यक खेळाडूंच्या चमूत होता, परंतु लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून 2 कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतले. सध्या तो श्रीलंकेच्या वन डे संघाचे कर्णधारपद भूषवित आहे आणि स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ही स्पर्धा 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार आहे. 26 मार्चला तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होईल. सध्या मलिंका श्रीलंकेच्या संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 

''आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद होता. परंतु, वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता त्यांनी मला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले. त्यामुळे मीही होकार कळवला आणि मंडळालाच आयपीएल व मुंबई इंडियन्सला याबाबत कळवण्याची विनंती केली. आयपीएलमधून काही पैसे कमावता येणार नसले तर देशासाठी काहीतरी करता येईल, याचा आनंद आहे." 

2020च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मलिंगाची निवृत्ती
श्रीलंकेच्या वन डे संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनंतरच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातील पराभवानंतर मलिंगाने ही घोषणा केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपनंतर माझी कारकिर्द संपुष्टात येणार आहे. मला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईन.'' 
 

Web Title: IPL 2019: Mumbai Indians Lasith Malinga to miss first six matches in IPL, for World Cup qualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.