हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलच्या 12 व्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण जिंकेल, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात चेन्नईला तीनही सामन्यांत पराभूत केले आहे, परंतु महेंद्रसिंग धोनीसारखा चतुर कर्णधार लाभलेला चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात धक्का देण्याची क्षमता राखतो. त्यामुळे त्यांना रोखावं कसं याचा गेम प्लान मुंबईच्या चाहत्यांनी तयार केला आणि नेमका तो चेन्नईच्या हाती लागला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा 'गेम प्लान' चेन्नईच्या हाती, CSKचा मास्टर स्ट्रोक
IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा 'गेम प्लान' चेन्नईच्या हाती, CSKचा मास्टर स्ट्रोक
IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 13:25 IST