Join us

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा ' गली बॉय' ठरतोय हिट; अंतिम संघामध्ये आहे तो फिट!

इंडियन प्रीमिअर लीग सुरू होण्यासाठा अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे फॅन्स आपल्या आवडत्या संघांना आतापासूनच फॉलो करू लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 11:04 IST

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग सुरू होण्यासाठा अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे फॅन्स आपल्या आवडत्या संघांना आतापासूनच फॉलो करू लागले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे संघांच्या प्रत्येक बारीक हालचालींवर त्यांची नजर आहे. अशाच एका ट्विटने मुंबई इंडियन्स चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट केलेला संघातील 'गली बॉय' नेटिझन्सच्या पसंतीत उतरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी 2018 तील सर्वोत्तम वन डे व कसोटी संघ घोषित केले. त्याशिवाय सर्वोत्तम वन डे व कसोटी खेळाडू, सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारांची नावे जाहीर केली. या तीनही पुरस्कारांवर भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाव कोरले. एकाच वर्षात हे तीनही पुरस्कार जिंकणारा कोहली पहिला खेळाडू आहे. 2018 वर्षांतील सर्वोत्तम वन डे व कसोटी संघांतही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसले. वन डे व कसोटी संघात दोन कॉमन नाव होती ती म्हणजे कोहली व जसप्रीत बुमराह... त्यामुळे मुंबई इंडियन्सने आपल्या पठ्ठ्याची पाठ थोपटण्याची संधी सोडली नाही. बुमराहने दोन्ही संघात स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सने बुमराहचे कौतुक केले. पण हे कौतुक हटके होते आणि त्यामुळे चाहते भरपूर खूश झाले. 

टॅग्स :जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सआयपीएल 2019