Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019: एबी डि'व्हिलियर्ससाठी मुंबई इंडियन्सचा 'हा' गोलंदाज ठरतोय घातक

कारण एबीला या गोलंदाजांने चक्क चार वेळा बाद केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:36 IST

Open in App

बंगळुरु, आयपीएल 2019 : एबी डि'व्हिलियर्स हा जगविख्यात धडाकेबाज फलंदाज आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा तर एबी हा कणा समजला जातो. पण मुंबई इंडियन्सचा एक गोलंदाज घातक ठरत असल्याचे दिसत आहे. कारण एबीला या गोलंदाजांने चक्क चार वेळा बाद केले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध एबीने चांगली कामगिरी केली आहे. मुंबईविरुद्ध एबीने 138.48च्या स्ट्राइक रेटने 511 धावा केल्या आहेत. पण तरीही मुंबईचा एक गोलंदाज एबीला मोठी खेळी करण्यापासून रोखत आला आहे. आज मुंबई आणि बंगळुरु यांचा या मोसमातील पहिला सामना आहे. या सामन्यात एबीला सावधान रहावे लागेल ते मुंबईच्या कृणाल पंड्याच्या गोलंदाजीशी. कारण एबीला सतावणारा मुंबईचा गोलंदाज कृणालंच आहे. आतापर्यंत एबीला मुंबईविरुद्ध एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात एबी अर्धशतक ठोकणार की कृणाल पुन्हा एकदा एबीला लवकर बाद करणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

बंगळुरुवर मुंबई इंडियन्सच भारी, जाणून घ्या...मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज आयपीएलच्या बाराव्या हंगामातला पहिला सामना रंगणार आहे. पण आतापर्यंत झालेल्या या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये नेमकं भारी कोण पडलंय, हे तुम्हाला माहिती आहे का...

आतापर्यंत मुंबई आणि बंगळुरु यांच्यामध्ये एकूण 23 सामने झाले आहेत. या 23 सामन्यांपैकी मुंबईने 14 सामने जिंकले आहेत, तर बंगळुरुने नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. बंगळुरुमध्ये या दोन्ही संघांमध्ये 9 सामने झाले आहेत. या नऊ सामन्यांपैकी तब्बल सामने मुंबईने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये बंगळुरुला विजय मिळवता आला आहे.

या हंगामात दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्याच लढतीत चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने बंगळुरुचे पानीपत केले होते. या सामन्यात बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. चेन्नईने बंगळुरुवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.

मुंबईलादेखील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव एवढा दारुण होता की, त्यांना गुणतालिकेत अखेरचे स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या संघाने मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युवराज सिंगने दमदार अर्धशतक झळकावले होते. पण युवराजला मुंबईला विजय मिळवून देता आला नव्हता. त्यामुळे बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय मिळवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

टॅग्स :एबी डिव्हिलियर्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल 2019