Join us

IPL 2019 : हार्दिकचा हेलिकॉप्टर शॉट पाहून धोनी फक्त हसतच बसतो तेव्हा...

चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीला हार्दिकनेच या सामन्यात बाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:12 IST

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंब इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर हा शॉट महेंद्रसिंग धोनीचा खास असल्याचे म्हटले जाते. पण या सामन्यात हार्दिकने हेलिकॉप्टर शॉट मारला आणि धोनी फक्त हा फटका पाहतच बसल्याच पाहायला मिळाले. 

चेन्नईविरुद्धच्या खेळीत हार्दिकने तिसऱ्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले. हार्दिकने हेलिकॉप्टर शॉट हा अखेरच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. अखेरचे षटक चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ब्राव्होने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हार्दिकने हेलिकॉप्टर शॉट मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी धोनीही हा फटका फक्त बघत बसल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि त्याची कृणाल पंड्याबरोबरच्या भागीदारीमुळे मुंबईला ही सन्मानजक धावसंख्या उभारता आली. मुंबईचा डाव यावेळी सूर्यकुमार यादवने सावरला. त्याने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकार लगावत ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याबरोबर अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी ४५ धावा कुटल्या. हार्दिकने आठ चेंडूंत नाबाद २५ आणि पोलार्डने सात चेंडूंमध्ये नाबाद नाबाद १७ धावा फटकावल्या. पंड्याने फक्त ही तुफानी खेळी साकारली नाही, तर गोलंदाजीमध्येही आपली कमाल दाखवली. चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीला हार्दिकनेच या सामन्यात बाद केले.

कोणत्या खेळाडूचा हेलिकॉप्टर शॉट आहे सरसक्रिकेट जगतामध्ये हेलिकॉफ्टर शॉटसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये असे काही हेलिकॉप्टर शॉट लागले आहेत की त्यांनाही तोड नाही. आयपीएलने आपल्या ट्विटरवर आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये फटकावलेल्या हेलिकॉप्टर शॉट्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हार्दिकच्या फटक्यापूर्वी यंदाच्या आयपीएलमध्ये चार फलंदाजांनी हेलिकॉप्टर शॉट लगावले आहे. यामध्ये पहिला क्रमांक येतो तो दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतचा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सनरायझर्स हैदराबादचा रशिद खान. दिल्ली कॅपिटल्सच्याच पृथ्वी शॉनेही हा शॉट लगावला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही हा फटका खेळला आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्यामहेंद्रसिंग धोनीमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019