Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : धोनी आऊट होता, पण शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला...

महेंद्रसिंग धोनी हा जसप्रीत बुमराच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आऊट होता. पण त्यानंतर तो डाव पूर्ण होइपर्यंत खेळत राहिल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 21:36 IST

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : एखादा खेळाडू आऊट झाला आणि तरीही तो डाव संपेपर्यंत खेळत राहीला, असे तुम्हाला पाहायला मिळाले नसेल. पण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात अशी एक गोष्ट झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जसप्रीत बुमराच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आऊट होता. पण त्यानंतर तो डाव पूर्ण होइपर्यंत खेळत राहिल्याचे पाहायला मिळाले.

धोनी जेव्हा खेळायला आला तेव्हा चेन्नईची फारशी चांगली स्थिती नव्हती. धोनीने आल्यापासून मुंबईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ले चढवले आणि चेन्नईला 131 धावा करून देण्यात मोठा वाटा उचलला. पण या सामन्यात धोनीला दैवानेही चांगलीच साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

लसिथ मलिंगाच्या 19व्या षटकात धोनीने दोन दमदार षटकार लगावले. अखेरच्या षटकातही धोनी फटक्यांची अतिषबाजी करेल, असे वाटत होते. पण बुमराच्या 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीचा झेल पकडला गेला. या चेंडूवर धोनी मोठा फटका मारायला गेला आणि त्याची बॅट हातातून निसटली. पण त्यावेळी धोनीचा झेल पकडला गेला होता. धोनी बाद झाल्याने मुंबईच्या खेळाडूंनी सुस्कारा सोडला. पण सामन्यात चांगलाच ट्विस्ट आला. धोनीबाद झाल्यावर मैदानावरील पंचांनी चेंडू योग्य आहे की नाही, याची तपासणी केली. त्यावेळी हा चेंडू नो-बॉल असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे धोनी नॉट आऊट ठरला आणि अखेरपर्यंत खेळत राहिला.

धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओमुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा विजय शंकर आऊट झाला. त्यानंतर मैदानात आला तो चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी. जेव्हा धोनीने मैदानात पहिले पाऊल टाकले तेव्हा चाहत्यांनी माही... माही... चा नारा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तर चाहत्यांनी धोनी नामाचा गजर करत स्टेडियम डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ 

धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले. कारण एकेकाळी चेन्नई सुपर किंग्स शंभर धावांचा टप्पा ओलांडणार की नाही, असे चाहत्यांना वाटत होते. पण धोनीने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत संघाला 131 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आता धोनी आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर चेन्नईला सामना जिंकवून देणार का, याची चर्चा रंगत आहे. धोनीने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या. त्याला यावेळी अंबाती रायुडूची चांगला साथ मिळाली. रायुडूने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. चेन्नईने आपले पहिले तीन फलंदाज फक्त 32 धावांमध्ये गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले. विजय यावेळी 26 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली.

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स