चेन्नई, आयपीएल 2019 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळत असलेल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची काळजी सर्वच संघ घेत आहेत. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आदी संघातील काही खेळाडू मायदेशासाठी रवाना झाले आहेत, तर येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय संघातील खेळाडूंना अद्याप विश्रांतीबाबत कोणताच संघ स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. त्याचा फटका भारताच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसण्याची भीती वाटू लागली आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या वक्तव्याने भर पडली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा हे आजारी असल्याची माहिती त्यांनी दिली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक
IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक
IPL 2019: आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळत असलेल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची काळजी सर्वच संघ घेत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 14:23 IST