IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान

धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 21:15 IST2019-05-07T21:11:10+5:302019-05-07T21:15:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2019 : MS Dhoni played well, Chennai Super Kings given 132 runs target to Mumbai Indians | IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान

IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान

चेन्नई, आयपीएल 2019 : धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले. कारण एकेकाळी चेन्नई सुपर किंग्स शंभर धावांचा टप्पा ओलांडणार की नाही, असे चाहत्यांना वाटत होते. पण धोनीने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत संघाला 131 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आता धोनी आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर चेन्नईला सामना जिंकवून देणार का, याची चर्चा रंगत आहे.



धोनीने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या. त्याला यावेळी अंबाती रायुडूची चांगला साथ मिळाली. रायुडूने या सामन्यात 29 चेंडूंत 37 धावा केल्या.



 

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. चेन्नईने आपले पहिले तीन फलंदाज फक्त 32 धावांमध्ये गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले. विजय यावेळी 26 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर रायुडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली.

धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा विजय शंकर आऊट झाला. त्यानंतर मैदानात आला तो चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी. जेव्हा धोनीने मैदानात पहिले पाऊल टाकले तेव्हा चाहत्यांनी माही... माही... चा नारा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तर चाहत्यांनी धोनी नामाचा गजर करत स्टेडियम डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ


Web Title: IPL 2019 : MS Dhoni played well, Chennai Super Kings given 132 runs target to Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.