चेन्नई, आयपीएल 2019 : आयपीएलच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी आज चुरस रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन मातब्बर संघांमध्ये. आतापर्यंत या दोन्ही संघानी आयपीएलमध्ये नेत्रदीपक कमगिरी केली आहे. गुणतालिकेत अखेरच्या क्षणी मुंबईने चेन्नईकडून अव्वल स्थान हिरावून घेतले होते. या गोष्टीचा बदला चेन्नई आजच्या सामन्यात घेणार की मुंबई अंतिम फेरीत पोहोचणार, याची साऱ्यांना उत्सुकता असेल.
LIVE
Get Latest Updates
11:49 PM
आता असेल होतील आयपीएलमधील सामने
11:48 PM
मुंबईने केले विजयाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
11:15 PM
मुंबईचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश
10:48 PM
कृणाल पंड्या शून्यावर आऊट
09:36 PM
मुंबईला मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट
08:30 PM
चेन्नईला चौथा धक्का
मुरली विजयच्या रुपात चेन्नईला चौथा धक्का बसला.
07:59 PM
चेन्नईला तिसरा धक्का
शेन वॉटसनच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. शेनला 10 धावा करता आल्या.
07:47 PM
चेन्नईला दुसरा धक्का
सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला मोठा धक्का बसला. रैनाला यावेळी पाच धावाच करता आल्या.
07:41 PM
चेन्नईला पहिला धक्का
फॅफच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का बसला. फॅफला सहा धावा करता आल्या. यापूर्वी फॅफला एका धावेवर जीवदान मिळाले होते.
07:36 PM
फॅफला एका धावेवर जीवदान
फॅफला कृणाल पंड्याच्या दुसऱ्याच षटकात जीवदान मिळाले. फॅफ त्यावेळी फक्त एका धावेवर होता.
07:15 PM
टॉस जिंकल्यावर धोनी काय म्हणाला, पाहा हा व्हिडीओ
07:09 PM
चेन्नईने नाणेफेक जिंकली
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.