मोहाली, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. ख्रिस गेलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर मयांक अग्रवाल व लोकेश राहुल यांनी पंजाबला 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 2011पासून मुंबई इंडियन्स मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर एकदाही पराभूत झालेला नाही. त्यांनी येथे खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. पण, शनिवारी त्यांची ही विजयी मालिका खंडित झाली. आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला मोहालीत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, या सामन्यात मुंबईच्या कृणाल पांड्यानं मोठी चुक करण्यापासून स्वतःला रोखलं...
मागील आठवड्यात राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातल्या सामना आर. अश्विन-जोस बटलर यांच्यातील मांकड रनआऊट प्रकरणाने गाजला. पंजाबचा कर्णधार अश्विनने जयपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थानच्या बटलरला मांकड रनआऊट केले आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. पंजाबने 14 धावांनी हा सामना जिंकला, परंतु त्या कृतीमुळे अश्विनच्या खिलाडूवृत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अश्विनवर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली. बटलरला असे बाद करण्यापूर्वी अश्विनने एकदा वॉर्निंग द्यायला हवी होती, असं मत अनेकांनी व्यक्त केलं.
![]()
मुंबई आणि पंजाब यांच्यातील शनिवारी झालेल्या सामन्यातही कृणाल पांड्यला मांकड रनआऊट करण्याची संधी होती. पण, त्यानं तो मोह आवरला. पंजाबच्या डावातील 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कृणाल पांड्या गोलंदाजी करण्यापूर्वीच मयांक अग्रवालने क्रीज सोडलं. पण, कृणालनं त्याला बाद केले नाही.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/157518
कृणालनं घेतला हार्दिकच्या अपमानाचा बदला
हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात पंजाबच्या ख्रिस गेलने दोन खणखणीत षटकार खेचले. त्यामुळे पांड्या किंचितसा दडपणात आलेला पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याला दोन खणखणीत षटकार खेचणाऱ्या गेलला कृणाल पांड्याने बाद केले. आठव्या षटकात कृणालच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात गेल हार्दिकच्या हाती झेल देऊन बसला... गेलची कॅच पकडताच हार्दिकने मैदानावर डान्स केला.