IPL 2019 : कोलकाताची दमदार बॅटींग, पंजाबपुढे 219धावांचे आव्हान

रसेलने 17 चेंडूंत 48 धावांची वादळी खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 09:27 PM2019-03-27T21:27:44+5:302019-03-27T21:41:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Kolkata's strong batting, challenge 219 runs to Punjab | IPL 2019 : कोलकाताची दमदार बॅटींग, पंजाबपुढे 219धावांचे आव्हान

IPL 2019 : कोलकाताची दमदार बॅटींग, पंजाबपुढे 219धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 218 धावा करता आल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पा आणि नितिश राणा यांनी अर्धशतके झळकावली.

पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम कोलकात्याच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ख्रिल लिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. पण सुनील नरिनने धडाकेबाद फलंदाजी केली. नरिनने 9 चेंडूंत 24 धावा केल्या. त्यानंतर नितिश राणा आणि रॉबिन उथप्पा यांनी 110 धावांची भागीदारी रचली. राणाने दमदार फलंदाजी करताना 34 चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 63 धावांची तुफानी खेळी साकारली. रसेलने 17 चेंडूंत 48 धावांची वादळी खेळी साकारली.

Web Title: IPL 2019: Kolkata's strong batting, challenge 219 runs to Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.