Join us

IPL 2019 : दिल्लीचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा विजय

सॅम कुरनने हॅट्ट्रिक घेत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 23:50 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता दिल्ली कॅपिटल्सची एकेकाळी ३ बाद १४४ अशी मजबूत स्थिती होती. पण त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी कच खाल्ली आणि सहज जिंकणारा सामना त्यांना गमवावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १६६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 152 धावा करता आल्या आणि पंजाबने हा सामना १४ धावांनी जिंकला. या सामन्यात सॅम कुरनने हॅट्ट्रिक घेत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच चेंडूवर त्यांना पृथ्वी शॉच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर श्रेयस अय्यर (२८) आणि शिखर धवन (३०) यांनी काही काळ फलंदाजी केली, पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर कॉलिन इनग्राम आणि रिषभ पंत (३९) यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला विजयासमीप पोहोचवले. पंत बाद झाल्यावर कॉलिनने 

दिल्लीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. त्यानंतर सॅम कुरन आणि मयांक अगरवाल हे दोघे बाद झाल्याने पंजाबची ३ बाद ५८ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि सर्फराझ खान यांनी संघाला डाव सावरला. सर्फराझने २९ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावा केल्या. सर्फराझ बाद झाल्यावर मिलरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात मिलर बाद झाला. मिलरने ३० चेंडूंच ४३ धावांची खेळी साकारली.

टॅग्स :किंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019दिल्ली कॅपिटल्स