मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल जेतेपदाचा चौकार खेचला आणि सर्वाधिक जेतेपद जिंकण्याचा मान पटकावला. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 साली आयपीएलचा विजयी चषक उंचावला आहे. त्यामुळे त्यांचे मुंबईत स्वागतही तितक्याच थाटामाटात होणे अपेक्षित आहे. मुंबईकर आपल्या लाडक्या संघाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला असून आजच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
अशी असेल मिरवणूक....
- सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईल
- मिरवणूकीतील सुरुवातीचा 400 मीटरचा प्रवास हा पुणेरी ढोलच्या गजरात काढण्यात येणार आहे
- जस्लोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून बस ट्रायडंटच्या दिशेने नेण्यात येईल
- त्यानंतर रात्री 9 वाजता अँटिलिया येथे खेळाडू, संघ मालक, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितील पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे .