नवी दिल्ली, आयपीएल 2019 : शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेकिंग्ज इलेव्हन पंजाबवरविजय मिळवला. पंजाबने दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग दिल्लीच्या संघाने केला. या सामन्यात दिल्लीने पंजाबवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने 12 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
12:00 AM
अखेरच्या षटकात दिल्ली जिंकली
11:43 PM
कॉलिन इनग्राम आऊट
11:41 PM
श्रेयस अय्यरचे अर्धशतक
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात मोलाची भूमिका बजावली.
11:24 PM
दिल्लीला तिसरा धक्का
रिषभ पंतच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला. पंतने सात चेंडूंत सहा धावा केल्या.
11:14 PM
दिल्लीला मोठा धक्का
शिखर धवनच्या रुपात दिल्लीला मोठा धक्का बसला. धवनने 41 चेंडूंत 56 धावा केल्या.
10:46 PM
धवन आणि श्रेयस यांची अर्धशतकी भागीदारी
10:22 PM
दिल्लीला पहिला धक्का
पृथ्वी शॉच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीला 13 धावा करता आल्या.
09:05 PM
पंजाबला मोठा धक्का
ख्रिस गेलच्या रुपात पंजाबला मोठा धक्का बसला. गेलने 37 चेंडूंत 69 धावा केल्या.
08:46 PM
गेलचे धडाकेबाज अर्धशतक
गेलने तुफानी फटकेबाजी करत 25 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
08:42 PM
डेव्हिड मिलर आऊट
मिलरच्या रुपात पंजाबला तिसरा धक्का बसला. मिलरला सात धावाच करता आल्या.
08:25 PM
मयांक अगरवाल आऊट
मयांकच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला. मयांकला दोन धावाच करता आल्या.
08:10 PM
पंजाबला पहिला धक्का
लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. राहुलने 9 चेंडूंत 12 धावा केल्या.
08:03 PM
... असा झाला टॉस, पाहा हा व्हिडीओ
08:02 PM
पंजाबची प्रथम फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.