हैदराबाद, आयपीएल 2019 : 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबाद संघाला शतकी सलामी दिली. या जोडीनं तीन वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला.
ख्रिस लीन आणि रिंकु सिंग यांच्या संघर्षानंतरही कोलकाता नाइट रायडर्सला रविवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 बाद 159 धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतर सातत्याने पडत राहिलेल्या विकेट्समुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. कोलकाताचा हुकमी एक्का आंद्रे रसेल याला फलंदाजीची फार संधी मिळाली नाही, परंतु त्याने 15 धावा केल्या. रिंकुने 25 चेंडूंत 30 धावा केल्या, तर लीनने 47 चेंडूंत 51 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता.
प्रत्युत्तरात
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 72 धाव चोपून काढल्या. या जोडीने शतकी भागीदारी करताना आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमधील या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी आहे. या जोडीनं आणखी एक विक्रम नावावर केला. हे आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात यशस्वी जोडी ठरली. या दोघांनी यंदाच्या मोसमात 733 हून अधिक धावांची भागीदारी केली. वॉर्नर आणि बेअरस्टो या दोघांनीही अर्धशतक झळकावले. वॉर्नर आणि बेअरस्टोने 2016च्या आयपीएलमधील शिखर धवन व वॉर्नर या जोडीचा 731 धावांचा विक्रम मोडला.